“धनुष्यबाण” चिन्हाबाबत सुनावणी आता नवीन वर्षात.
मुंबई, ता 12 (संतोष पडवळ) : राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना नेमकी कुणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती. मात्र आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार ‘धनुष्यबाणा’वरील पुढील सुनावणी नव्या वर्षात होणार आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली.
धनुष्यबाण कुणाला मिळणार? या वादावर आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून कागदपत्र दाखल केली आहे. आज दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते.पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.