तब्बल 21 वर्षानंतर भारताला “मिसेस वर्ल्ड-2022” किताब
दिल्ली, ता 19 डिसें (ब्युरो रिपोर्ट) : मिसेस वर्ल्ड 2022 या स्पर्धेत भारतातील जम्मू येथील सरगम कौशल हिने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. 21 वर्षानंतर हा किताब भारतात परत आणण्यासाठी सरगमने 63 देशातील स्पर्धकांना मागे टाकलं आहे. सरगम कौशल ही जम्मू काश्मिर येथील राहणारी आहे. ती एक मॉडेल आणि शिक्षिका आहे. 2018 मध्ये तिने अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि याचं वर्षी तिने मिसेस इंडिया 2022 मध्ये देखील भाग घेतला होता. सरगम कौशलचे पती भारतीय नौदलामध्ये आहेत.
21 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय तरुणी सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड विजेतेपद पटकावले असून यापूर्वी 2001 मध्ये, अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने विजेतेपद पटकावले होते. मिसेस वर्ल्ड 2022 कार्यक्रम शनिवारी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांच्या हस्ते सरगम कौशलचा मुकुट घालण्यात आला.