भारतीय मराठा संघ, ठाणे वतीने दिनदर्शिका प्रकाशन व पावनखिंड स्वच्छता अभियान.

0

ठाणे, ता 20 (संतोष पडवळ) : सकल मराठा फाऊंडेशन, ठाणे प्रणित भारतीय मराठा संघाच्या वतीने शिवमय दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व पावनखिंड स्वच्छता मोहीम काल शूरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंड येथे आमदार मा.श्री.विनयजी कोरे व श्री. सर्जेराव पाटील मा.सभापती सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभाग जि.प.कोल्हापूर यांच्या शुभहस्ते तसेच भारतीय मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अविनाश पवार, सरचिटणीस महाराष्ट्र श्री.राजेंद्र पालांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रसंगी आमदार विनय कोरे यांनी सदर दिनदर्शिकेबद्दल विशेष कौतुक करताना अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमास दाद दिली.यातून समाजाला व पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर् मावळ्यांचि, गड किल्ल्यांचि तोंडओळख होण्यास मदत होईल असे नमूद केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भारतीय मराठा संघ सचिव एस डी पाटील, खजिनदार श्री.अजित जाधव,उपाध्यक्ष श्री.दिपक पालांडे, सचिव श्री.महेश महापदी,ठाणे महानगर प्रमुख श्री.अरूण फणसे, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रकाश पाटील सर,उद्योग आघाडी उपाध्यक्ष दिलीप लटके, संदीप पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी ठाणे शहर सचिव श्री.अनिल काकुळते, ठाणे शहर अध्यक्ष उमेश गोगावले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री.अपासाहेब भोसले, जिल्हा सचिव श्री.सुदर्शन चव्हाण,पाटण तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ काळकुटे (पाटील), देवेंद्र पानकर, व ठाणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा,सातारा जिल्हा, मुंबई येथिल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!