जिल्हा परिषदेच्या वडगाव आनंद शाळेच्या विद्यार्थांनी शाळेने लावलेल्या केळीवर मारला ताव
जुन्नर, आळेफाटा, ता 21 डिसें (संतोष पडवळ) : नेहमीप्रमाणेच वेगळे व आदर्श ठेवण्याचे काम जिल्हा परिषदची वडगाव आनंद येथील प्राथमिक शाळेत होत असतो. शाळेने गावातील नागरिक तसेच केळी व्यापारी व शाळेचे माजी विद्यार्थी श्री.दशरथ भिकाजी वाळूंज व त्यांचे सहकारी राहुल खोकले यांचेकडून शाळेसाठी १०० हून अधिकाची रोपे भेट देण्यात आली होती, त्यात शेणखत देण्याचे काम श्री.शशिकांत कारभारी वाळूंज, श्री.बाळासाहेब ज्ञानेश्वर शिंदे व डॉ.सिद्धार्थ गडगे यांचेकडून प्रत्येकी १-१-1 टॉली शेणखत देण्यात आले होते. सदर केळी परसबागेत लावण्यात आली होती, आता केळीच्या बागेत छान छान केळीचे घड आपणास दिसून येत आहेत, दरम्यानच्या कालावधीत जिल्हा परिषद पुणे कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मा.श्री.आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांनी देखील या शाळेला भेट देत परसबागेचे कौतुक केले होते. आज तर चक्क या सेंद्रिय केळी पिकवून त्याचे वाटप शाळेतील मुलांमध्ये करून मुलांना या सेंद्रिय केळांचा मनमुराद आनंद घेतला, यामागील उद्देश अगदी साफ होता, विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, या उद्दात हेतूने शाळेचे व्यवस्थापन अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार व सर्व सदस्य यांचे नेहमीच सहकार्य लाभात असते. या परसबागेची देखरेख करणेचे काम जसे शाळेतील मुले, शिक्षक तसेच शालेय व्यवस्थापन शिक्षणतज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.डी.बी.नाना वाळूंज हे दैनदिन स्वरूपात करत असतात. केळांचा स्वाद व आनंद घेत मुलांनी केळांवर ताव मारला. या केळी पार्टीचे परिसरात भरभरून कौतुक चालू आहे. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहशिक्षिका वृषाली कालेकर, मनीषा इले, संगीता कुदळे, गौरी डुंबरे यांनी सहभाग घेतला होता.