दिव्यातील वीर हनुमान मित्र मंडळ व समर्थ प्रतिष्ठान कब्बडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
ठाणे, दिवस ता 26 डिसें (संतोष पडवळ) : दिव्यातील कोकण क्रांती प्रतिष्ठान आयोजित भव्य चौरंगी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वीर हनुमान मित्र मंडळ, समर्थ प्रतिष्ठान),या महिला व पुरुष दोन्ही संघांनी द्वितीय क्रमांक मिळवत कब्बडीत दिवा शहराचे नाव उज्वल केले आहे.
हा खेळ भारतीय उपखंड आणि इतर आसपासच्या आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात कबड्डीचे वर्णन आढळत असले तरी २०व्या शतकात हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा खेळ आहे असे कबड्डी मधील काही जाणकारांनी सागितलं.
दिव्यातील कबड्डी या खेळाला सघांचे आधार अध्यक्ष व आधार स्थंभ निलेश म्हात्रे हे असून ते संघाला वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करत प्रत्येक खेळाडूची विशेष काळजी घेत असतात भविष्यात संघाचे दोन्ही गट जिल्हा पातळीवर,राज्यपातळीवर चमकतील असे या वेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केले