धक्कादायक ; भर रस्त्यात अभिनेत्रीची हत्या
झारखंड, ता 29 डिसें (ब्युरो रिपोर्ट) : पश्चिम बंगालमधील एका हायवेवर ही घटना घडली आहे. रिया कुमारी तिचा पती प्रकाश कुमार याच्यासोबत कारनं प्रवास करत होती. काही गुंडांनी त्यांची कार थांबवून लूटमार करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता गुडांनी गोळी झाडली. यात रिया कुमारी हिचा जागीच मृत्यू झाला. सुत्रांच्या माहितीनुसार रिया कुमारीचे कुटुंबीय हावडाहून कोलकाता येथे जात होते. कारमध्ये तिचे पती प्रकार कुमार आणि अडीच वर्षांची मुलगी देखील होती.
प्रकार कुमार कार चालवत होते. बुधवारी सकाळी ६ वाजता बग्नान येथे महेश खेडा ब्रिजवर कार थांबवली असता काही गुंडांनी त्यांना लूटण्याचा प्रयत्न केला. रियानं यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात गुडांनी गोळीबार केली.गोळी लागल्याने रिया जागीच गतप्राण झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुंडांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.