तीस वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा.
जुन्नर, पिपंरी पेंढार ता 30 डिसें (संतोष पडवळ) : पिपरी पेंढार येथील श्री सद् सीताराम महाराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा तब्बल ३० वर्षांनंतर चैतन्य गार्डन ओतूर कॉलेज येथे पार पडला. प्रसंगी जवळपास ७० माजी विद्याथ्यांनी हजेरी लावली होती.
सदर मेळाव्याला संतोष जाधव, डॉ. सचिन शिंदे, संतोष खोकले, रुपाली कुटे डॉ. प्रज्ञा पवार, राजेंद्र भळगट, संतोष दुरगुडे यांनी विशेष मेहनत घेतली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष दुरगुडे व डॉ. प्रज्ञा पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या माजी विध्याथ्यानी दिवसभर मनमोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले. विजय ठुबे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले विचार व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या तर मंगेश शिंदे यांनी आता सगळे माजी विध्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या विषयी माहिती संकलित करून भविष्यात कोणाला काही गरज पडली तर त्याचा फायदा होऊ शकतो त्या विषयी मार्गदर्शन केले.
तसेच शालेय जीवनातील एक माजी सहकारी विध्यार्थी मित्र काही दुर्धर व्याधीग्रस्त असल्याने त्याला एक भरीव निधी जमा करून देण्यात आला दुपारच्या सत्रात स्नेह भोजन घेतल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना काळानुसार झालेल्या विविध विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी वर्गमित्र श्री हॉस्पिटल आळेफाट्याचे डॉ. सचिन शिद यांचे तर्फे प्रत्येक वर्गमित्र व वर्ग मैत्रिणीला एक स्मृतिचिन्ह देण्यात आले तसेच निलेश गांधी यांच्यातर्फे प्रत्येकाला एक चॉकलेट पॅकेट देण्यात आले. डॉ. सचिन शिंद यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.