दिवा महोत्सवाची जल्लोषमय वातावरणात खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थित सांगता.

0

क्लस्टर योजनेच्या माध्यमातून दिवेकरांना लवकरच हक्काचं घर मिळेल – खासदार श्रीकांत शिंदे

ठाणे, दिवा ता 31 डिसें ( संतोष पडवळ ) : धर्मवीर मित्रमंडळ आणि बाळासाहेबांची शिवसेना आयोजित दिवा महोत्सव काल सहाव्या दिवशी जल्लोषमय वातावरणात सांगता झाली. गेल्या चौदा दिवा महोत्सवापैकी यावर्षी मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली. लोकांच्या गर्दीमुळे हा महोत्सव ऐतिसाहसिक झालेला पहायला मिळाला.काल दिवा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली.यावेळी जमलेल्या जनसमुदायाचे आभार मानले.यावेळी संबोधित करताना दिव्यातील अनधिकृत असलेल्या आणि वारंवार असुविधांपासून वंचित असलेल्या दिव्याबाबत प्रश्न मांडले.ते म्हणाले की,दिवा शहर हा सर्वांना सामावून घेणारा शहर आहे.या शहरात मध्यम, कनिष्ठ व श्रीमंत असे सर्वच प्रकाचे लोक राहत आहेत. म्हणून येथील जनतेसाठी रेल्वेच्या सुविधा असतील, त्याचबरोबर महापालिकेच्या सुविधा असतील त्या समस्यांपासून दिवा वासीयांची सुटका झाली पाहीजे.या हेतून आपले लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व सदस्य याठिकाणी काम करीत आहेत.त्यांच्या माध्यमातून आज दिव्यात सातशे ते आठशे कोटींची कामे झालेली आहेत.तेथील नगरसेवकांवर तसेच मुख्यमंत्री शिंदेसाहेबांवर जो तुम्ही विश्वास दाखवित आहेत तो भविष्यात कमी होता काम नये.पुढेही त्या अनुषंगाने पुढे कामे चालूच राहणार आहेत.

*दिव्याला हक्काची व अधिकृत घरांची गरज*

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे.लोकांना परवडणारी घरे जी आहेत ती दिव्यामध्ये मिळतात.परंतु नेहमी आपल्या दिवेकरांवर एक अनधिकृतपणाचा स्टँम्प लावला जात आहे. तो स्टँम्प कायमस्वरुपी आपल्यावरील फुसला गेला पाहीजे. त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी आहे की,जसे ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आपण चालू झालीय.त्याच धर्तीवरती क्लस्टर योजनेचा सर्वे हा उद्या दिव्यातही सुरु होणार आहे.त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या हक्काचं आणि अधिकृत घर जे आहे ते या ठिकाणी भेटणार आहे.प्रसंगी कॅॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक लोककलावंत, मा.महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह सर्व मा नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!