अखेर दिव्यात क्लस्टर सर्वेक्षण सुरु ; अनधिकृत घरे अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा.!

ठाणे, दिवा ता 3 जाने (संतोष पडवळ) : ठाणे शहराच्या धर्तीवर आज पासून दिवा शहरात क्लस्टर सर्वे सुरु झाला. दिवा शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती, अनधिकृत घरे तसेच दाटीवाटीत वाढलेली झोपडपट्टी यांचा सुनियोजित व सुनियांत्रित विकास करण्यासाठी तसेच सदर योजनेचे अचूक नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी क्लस्टर सर्वेक्षण टीम दिव्यात दाखल झाली आहे. सदर क्लस्टर सर्वेक्षणात भविष्यातील घरे, रस्ते, सेवा सुविधा कश्या असतील याच नियोजन, जागेचा वापर कसा असेल याचा आराखडा तसेच बांधकामाचे स्वरूप, रहिवास्यांना क्लस्टरच्या विकास योजनेतून मिळणाऱ्या भविष्यातील लाभाची निश्चिती मिळणार असल्याने ठाणे महानगरपालिकेचे क्लस्टर विभागाचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील व अक्षय गुडदे तर सहायक अभियंता कुणाल मुळे व मनीषा केदारे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षणात सामील होते तर सदर सर्वेक्षणाला सहकार्य करण्यासाठी मा. उप महापौर रमाकांत मढवी, मा नगरसेवक अमर पाटील यांच्यासह उमेश भगत,निलेश पाटील, भालचंद्र भगत, आदेश भगत उपस्थित होते