दिव्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मा आमदार सुभाष भोईर यांच्याहस्ते दिनदर्शिका प्रकाशन.
ठाणे, दिवा ता 3 जाने ( संतोष पडवळ) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा उपशहर प्रमुख सचिन राम पाटील संकल्पनेतून प्रकाशित करण्यात आलेल्या
दिनदर्शिका २०२३ चे आज प्रकाशन कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख मा.आमदार श्री.सुभाष गणू भोईर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवल साहेब, कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे साहेब, युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, उपशहरसंघटक प्रियांका सावंत, विभागप्रमुख राजेश भोईर, चेतन पाटील, मच्छिंद्र लाड, युवा सेनेचे अभिषेक ठाकूर, महिला आघाडी विभाग संघटक स्मिता जाधव, उपविभाग संघटक विनया कदम, समाजसेवक हेमंत नाईक, विकास इंगळे शाखाप्रमुख अजित माने, सतीश निकम, वैष्णव पाटील,अक्षय म्हात्रे , तुषार सावंत उपस्थित होते.