दिव्याचं सिंगापूर, क्लस्टर, मोहत्सव फक्त पुड्या सोडण्याच काम – विजय भोईर, भाजप.
ठाणे, दिवा ता 3 जाने (संतोष पडवळ) : दिवा महोत्सव म्हणजे आता फक्त एक पुड्या सोडण्याचा महोत्सव म्हणून वाटू लागला आहे. दिव्याचा सिंगापूर, दिव्यात क्लस्टर इ. योजनांचा भडिमार केला.अश्या कित्येक घोषणा यापूर्वी झाल्या पण त्या निष्फळ ठरल्या. आता एक बातमी फिरतेय क्लस्टर सर्वे सुरू झाला. हे सर्वे असे यापूर्वीही या मंडळींनी कित्येक केले पण त्याला पूर्णत्व दिलं नाही. क्लस्टर योजना अंमलात आणणं म्हणजे यांना हातचा मळ वाटतोय. स्टेजवर येऊन घोषणा करण्यात काय जातेय? आधी लोकांना या योजनेची नीट माहिती व्हायला हवी, कित्येक वर्षे लोटली जातील काही सांगता येत नाही. आपण जर मनापासून ही योजना कार्यान्वित करत असाल तर नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु तोपर्यंत आज दिवेकरांना ज्या अडचणी आहेत त्यावर तुम्ही गप्प का? आम्ही जेव्हा एखादा विषय उचलतो तेव्हा तुम्ही त्यावर हालचाल करता आणि मग फुकटचे श्रेय घेऊन मोकळं होता.असंच ठाण्यात क्लस्टर राबवली जाईल सांगण्यात आलं पण अजून कसलाच ठिकाणा नाही, ५०० चौ.फूट पर्यंत घरांना करमाफी, आरोग्य केंद्र, दिव्यातील सार्वजनिक सुलभ सौचालय, एकही बस थांबा शेड, पुरेसा पाणी पुरवठा मंजूर होऊनही पाण्याची बोंबाबोंब इत्यादी घोषणा झाल्या पण त्या फक्त कागदावर राहिल्या. तरी अजूनही जे वास्तव आहे त्यावर सक्रिय व्हा उगाच लोकांना गृहीत धरून नको त्या भूलथापा मारू नका. आज लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे, इतरही अनेक मुलभूत प्रश्न आहेत तेही सोडवा मग दिव्याचा सिंगापूर बनवा असे स्पष्ट प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना भाजपचे ठाणे शहर कार्यकारणीचे श्री विजय अंनत भोईर यांनी केले आहे.