महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व टायटन मेडिसिटी आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा.
प्रिंट मीडिया कार्यक्षम आणि बळकट होणे काळाची गरज आहे ..डॉ.विश्वासराव आरोटे
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व टायटन मेडिसिटी यांच्याकडून देण्यात आलेले वैद्यकीय योजना कार्ड चे वाटप
ठाणे ता 7 जाने (संतोष पडवळ): मराठी पत्रकारितेचे जनक (दर्पणकार) बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दि.६ जानेवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरास डॉ. विश्वासराव आरोटे (सरचिटणीस) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, श्री मंगेश विश्वासराव- वरिष्ठ पत्रकार, श्री जतीन राय- (संचालक) राममूर्ती एज्युकेशन सोसायटी, श्री प्रमोद इंगळे(प्रमुख सल्लागार)म. रा. म.प.सं, श्री नितीन शिंदे (कोकण विभाग अध्यक्ष) म. रा. म. प. सं, प्रभाकर जाधव (ज्येष्ठ पत्रकार),सुरेश पाटीलखेडे ओबीसी नेते,डॉ.राजश्री जाधव मेडिकल डायरेक्टर टायटन मेडिसिटी कासारवडवली,डॉ. अश्विनी मुळे पाटील मनोरुग्नतज्ञ,श्री मनोज गुप्ता मार्केटिंग हेड टायटन हॉस्पिटल यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती लाभली.
यावेळी सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार, टायटन मेडिसिटी डायरेक्टर डॉ.राजश्री जाधव आणि मनोतज्ञ डॉ. अश्विनी मुळे पाटील यांनी नागरिक आणि समस्त पत्रकार बंधू-भगिनी यांना वैद्यकिय मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी ठाणे शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांना पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारीना नियुक्तीपत्र टायटेन मेडिसीटी तर्फे वैद्यकिय योजना कार्ड चे वाटप करण्यात आले
महाआरोग्य तपासणी शिबीरास नागरिक व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल अध्यक्षांनी आभार व्यक्त केले आहेत.