ग्लोबल महाराष्ट्रीयन रियल इस्टेट सोहळ्यास मराठी बांधकाम व्यवसायिकांची लक्षणीय उपस्थिती
मुंबई, ता 7 जाने (संतोष पडवळ) : मुंबईत ग्लोबल महाराष्ट्रीयन रियल इस्टेट सोहळ्यास मराठी बांधकाम व्यवसायिकांची लक्षणीय उपस्थिती ” मी उद्योजक होणारच ह्या मंचातर्फे पार पडलेल्या ग्लोबल महाराष्ट्रीयन रिअल इस्टेट सोहळ्यात अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिकांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बांधकाम क्षेत्रातील आव्हाने व प्रश्न ह्या संदर्भांची उत्तरे हावरे समूहाचे श्री सुरेशजी हावरे व बावीस्कर समूहाचे श्री प्रकाश बाविस्कर यांनी माहिती दिली.ह्या कार्यक्रमात पर्यटन मंत्री तसेच बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य व्यक्तिमत्व श्री मंगलप्रभात लोढा सर ह्यांनी बांधकाम क्षेत्रात यश मिळवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे.निर्णय व किती धोका घेतला पाहिजे . या संदर्भात मार्गदर्शन केले श्री अजित मराठे यांनीही मराठी बांधकाम व्यवसायिकांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. ह्याच साठी मराठी बांधकाम व्यवसायिक संघाची स्थापना करण्यात आली आहे.असे सांगितले त्याच बरोबर भोसले पाटेकर ग्रुपचे श्री बाबासाहेबभोसले समूहाचे श्री बाबासाहेब भोसले , तेजस समूहाचे श्री संग्राम पाटील वास्तुपूर्ती समूहाचे श्री संतोष आंबवणे सर ह्या सर्व मान्यवरांनी आपले अनुभव व आलेल्या आव्हानावर कशी मात केली. संकटाचे संधीत कसे रूपांतर केले. कठीण परिस्थितीला कसे सामोरे जताना अचुक निर्णय घेतले असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन उपस्तीताना केले.रेरा प्रमुख श्री विजय सतबीर सिंग यांनी रेरा बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाची सांगता निर्माण ग्रुपचे श्री राजेंद्र सावंत यांनी केले.
ह्या कार्यक्रमास अभिनेते श्री राहुल रानडे स्टेट बँकेच्या शर्वरी कुलकर्णी मॅडम , ताई फौंडेशन चे श्री संजय पवार
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार आयोजक श्री भालचंद्र पाटे , निलेश मोरे , संतोष विचारे , हेमंत मोरे ह्यांनी मानले.