दिव्यातील संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश

0

ठाणे, दिवा. ता 7 जाने ( संतोष पडवळ) : दिवा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म न. ५/६ वरून दिवा ते रोहा, पनवेल, वसई तसेच काही कोकणातल्या जाणाऱ्या गाड्या नियमित सुटत असतात परंतु तिकडे प्रवाश्यांना सुलभ शौचालयाची कोणतीही सोय नव्हती. लहान मुलं, महिलांची त्यामुळे खूपच गैरसोय होत असे.संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री विजय अनंत भोईर व त्यांचे सहकारी या अनुषंगाने वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत राहिल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना या मागणीची दखल घेऊन प्लॅटफॉर्म क्र ५ व ६ वर शौचालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. रात्री अपरात्री ५/६ क्र फलाटावर लहान मुलं, आबालवृद्धांचे, महिलांचे खूपच शौचालया अभावी हाल होत असे. त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासन तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांचे संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे विजय भोईर यांनी आभार मानले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!