दिवा भाजप आयोजित मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.
ठाणे,दिवा ता 7 जाने (संतोष पडवळ) : दिवेकरांसाठी भाजपने आज मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबीरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, डोळे तपासणी, कोलेस्टॉल, रक्तातील हिमोग्लोबिन इत्यादी तपासणी सोबत हायपर टेंशन गोळ्या, मधुमेह गोळ्या, मल्टीविटामिन गोळ्या , डोलो टैबलेट, बॉडी पैन किलर गोळ्या, ओ आर एस पावडर, कॅण्डिजैन ट्युब ,व इतर मोफत औषधे वाटप करण्यात आली .
सदर शिबिरात दीडशे पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला प्रसंगी सदर शिबिरास रोहिदास मुंडे, नरेश पवार, ज्योती पाटील,अशोक पाटिल, विजय भोईर, विनोद भगत, , गणेश भगत, सचिन भोईर, रोशन भगत, मधुकर पाटील, समीर चव्हाण, युवराज यादव, अवधराज राजभर, मनोज इत्यादी उपस्थित होते