डोंबिवलीत फोर्टी – फिफ्टी प्लस गायन स्पर्धा उत्साहात संपन्न. साप्तहिक शब्दखडगचा अनोखा उपक्रम

0

डोंबिवली, ता 9 जाने (प्रतिनिधी) : आॕर्केस्ट्रा आर्यन धून, साप्ताहिक शब्दखडग,मैत्रेय प्रोडक्शन आणि सर्वोदय प्रसाद सामाजिक संस्थेने डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यालयात फोर्टी – फिफ्टी प्लस हौशी गायकांना गाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर स्पर्धेत डोंबिवलीसह मुंबई, ठाणे,नाशिकहुन अनेक 40 + पासून अगदी 75 वयापर्यंतचे गायक -गायिकांनी भाग घेतला होता.
*कार्यक्रमाचे माध्यम प्रायोज – फ्री प्रेस इंग्रजी. दैनिक नवशक्ति. टिटवाळा न्यूज. साप्ताहिक शब्द खड्ग. आपला शहर नामा. शिवनेरी न्यूज. बेधडक ठाणे न्यूज लाईव्ह. आणि आपले शहर हे होते.*
कार्यक्रमाला परीक्षक म्हणून श्री. संजय खडपे यांनी मोलाचे योगदान दिले.. श्री. संजय खडपे यांनी गाणं कसं गायला हवं या बद्दल नवोदित गायकांना स्वतः गाणे गाऊन मार्गदर्शन केले तर. दुसऱ्या परीक्षक तथा आयोजक असलेल्या सौ. रेखा निकुंभ यांनी त्यांच्या गोड आवाजात अंबेमातेची आरती गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले. शब्द खड्गचे सर्वेसर्वा तथा या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असलेल्या प्रा. दिपक जाधव यांनी गाणे कसे निवडायचे आणि तिथे गायल्या गेलेल्या प्रत्येक गाण्याचा किस्सा सांगत खुमासदास सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. सुनिल बनसोडे. सौ. साईली बनसोडे. सर्वोदय प्रसाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. शाम चौगले. शिवाजी जाधव. समाधान बाविस्कर. जय डगळे. हर्ष डगळे. रोहित मुळे. नरेंद्र वैराळ. दिलीप मिश्रा. लावण्या मायाचे संपादक रवी लोहार. लावण्या मायाच्या सर्वेसर्वा प्रिया पाटील. मनिष दुबे. महेंद्र धुरळ, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बोरसे सर. रमेश शिंदे सर. बाबुराव जाधव. रणधीर कणोजिया. लता जाधव आदी अनेकांनी सहकार्य केले. तर गायक म्हणून दिपा देहेरकर. गुरूनाथ आरावकर. लतिका जोगळेकर. विद्या कुलकर्णी. पुंडलिक गोडे. रविकांत जाधव. योगेश बोरसे. महेश भागवत. नरेंद्र वैराळ. वैशाली टण्णू. आशा चौधरी. सुनंदा शेलार. मनिषा कोदे. डाॕ. नेहा निकुंभ. मंगल पवार. मीना पाटील. मनीषा पवार. उषा वाघुळदे. उषा घोरपडे. सुवर्णा क्षीरसागर अशा अनेक गायक गायिकांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली.. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित गायक गायिकांना प्रशस्तीपत्र आणि मंगल पवार. आशा चौधरी. योगेश बोरसे. महेश भागवत. गुरूनाथ आरावकर आणि रविकांत जाधव या सहा जणांना विशेष प्राविण्य अशी सन्मानचिन्हं देण्यात आली..

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!