दुधात भेसळ करणारे पाच जण अटकेत ; अन्न व औषध प्रशासन कारवाई.

मुंबई, ता 12 जाने (संतोष पडवळ) : ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदाई व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या करीता अन्न व औषध प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते तसेच ग्राहकांना खाद्यपदार्थाचा दर्जा खात्रीशीर मिळावा म्हणून अन्न अस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्याचे काम सातत्याने अन्न व औषध प्रशासनामार्फत चालू असते. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग व गुन्हे शाखा नियंत्रण, आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांचे संयुक्त कारवाईत दि.१०.०१.२०२३ रोजी
१) श्री. वीरेय्या रोशैय्या गज्जी, वय ५२ वर्षे,
२) श्री. श्रीनिवास नरसय्या वडलाकोंडा, वय – ३९ वर्षे,
३) श्री. नरेश मरेया जडाला, वय-२९ वर्षे,
(४) श्री. अंजैय्या गोपालू बोडपल्ली, वय ४२ वर्षे,
५) श्रीमती रमा सत्यनारायण गज्जी, वय ३० वर्षे, पोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१ यांचे राहत्या घरी धाडी टाकल्या असता गोकुळ व अमूल या नामांकित कंपनीच्या दुधाची पाकिटे एका कोप यात ब्लेडने कापून त्यामधील काही दुध काढून त्या पॅकेटमध्ये पाणी टाकून स्टोव्ह पीन व मेनबत्तीच्या सहाय्याने पुन्हा पॅकेटचा कोपरा सिल करीत असल्याचे आढळून आल्याने सदर पाच ठिकाणी टॅम्परड दुधाचे एकूण नऊ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. सदर पाचही ठिकाणावरील एकूण १०६४ लिटर, बासष्ट हजार रुपये एवढ्या किंमतीचा टेंम्परड दुधाचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे. सदर पाचही इसमांनविरुद्ध समतानगर पोलीस ठाणे, कांदिवली येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला असुन पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.
सदर ची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री महोदय श्री. संजयजी राठोड व अन्न व औषध प्रशासनाचे मा. आयुक्त श्री. अभिमन्यू काळे (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शना खाली सहायक आयुक्त (अन्न) श्री.बि.एन.चव्हाण यांचे नेतृत्वाखाली बृहन्मुंबई विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. तुषार घुमरे व श्री. सुमित खांडेकर यांनी घेतली.