दिवा शहरात खोदलेले अर्धवट रस्ते व गटारे तसेच मूलभूत सुविधाचा अभावामुळे समाजसेवक अमोल केंद्रे यांच प्रभागसमितीचे सहायक आयुक्तांना निवेदन
ठाणे, दिवा ता 13 जाने (संतोष पडवळ) मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या दिवा शहरात अनेक ठिकाणी अर्धवट खोदून ठेवलेले रस्ते व गटारांची कामे अतिशय संथ गतीने सुरु असून अनेक ठिकाणी गटारंवरील तुटलेली व अर्धवट झाकणे दिसून येतं असून दिवेकरांना आपघाताला सामोरे जावे लागत आहे. दिवा-आगासन रोडवर SMG व ग्लोबल शाळेजवळ गतिरोधक नसल्याने विध्यार्थी व पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे परिणामी अनेक छोटे मोठे आपघात होत असून प्रसासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष दिसून येत आहे. श्लोक नगर फेस 2, एंजल पॅराडाईज शाळा नारायण भगत नगर जाणारा रस्ता, मुंब्रा देवी कॉलनी ट्रान्सफॉर्मर रस्ता बनणार तरी कधी ? गेल्या 10 वर्षा पासून नागरिक वाट पाहत आहेत. ठाणे महानगर पालिका किंवा लोकप्रतिनिधीना याचा विसर पडला आहे का ? 2017 मध्ये निवडणुकीच्या वेळी रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले गेले परंतू रस्ता कधी होणार ? अनेक वेळा आंदोलन करूनही दखल घेतली का जात नाही. मंत्री, संत्री येणार असल्यास एका रात्रीत रस्ते बनवले जातात. पण ज्या नागरिकांच्या मतदानाने निवडून आलात त्या नागरिकांना चालण्यासाठी रस्ते का बनवण्यात येत नाही याबद्दल दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त फारुख शेख यांना निवेदन दिले आहे.
श्लोक नगर फेस टू रस्ता, मुंब्रादेवी कॉलनी ट्रांसफार्मर रस्ता, एंजल पॅराडाईज शाळा, नारायण भगत नगर, दिवा स्टेशन जाणारा रस्ता, बनवण्यात यावा.रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात यावी.
तसेच दिवा स्टेशन रोड फेरीवाला मुक्त करून फेरील्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. याची दखल न घेतल्यास दिवेकरांच्या सोबत जन आंदोलन करण्यात येईल.आंदोलनाची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असे निवेदनात म्हटले आहे.