दिव्यात मकरसंक्रांती निमित्त भाजपकडून भव्यसंत पदयात्रेचे आयोजन
ठाणे,दिवा ता 15 जाने (संतोष पडवळ) :-सिद्धिविनायक गणपती मंदिर व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून भव्य संत पदयात्रेचे आयोजन दिवा येथे करण्यात आले होते.
सिद्धिविनायक गणपती मंदिर,विठ्ठल मंदिर साबे गाव, जीवदानी नगर,टाटा पॉवर रोड,विष्णू पाटील नगर या मार्गावर सदर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पदयात्रेत साधुसंतांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकसंतोष पुजारी – Rss ठाणे जिल्हा धर्मजागरण समन्वयक संयोजक अमित आयरे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंब्रा दिवा शीळ नगर कार्यवाहक ओमप्रकाश मिश्रा – Rss मुंब्रा-दिवा धर्मजागरण प्रमुख, अनिल सिंह – Rss मुंब्रा दिवा व्यवसायिक प्रमुख इस्कॉन प्रमुख – आत्माराम हरिदास, आनंद ललिता देविदासी, वारकरी संप्रदाय – ह भ प खेडकर महाराज आणि दिवा वारकरी संप्रदाय.. भारतीय जनता पार्टीचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे, ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर, संघटक सरचिटणीस दिलीप भोईर,युवा अध्यक्ष सचिन महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती राजकांत पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, वार्ड अध्यक्ष नागेश पवार, उत्तर भारतीय मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर रमेशयादव,कल्पेशसारस्वत,आदि सह अनेक मान्यवर उपस्थित होते.