डोंबिवलीतील गावदेवी विद्यामंदिर पावर पॉइंट स्पर्धेत प्रथम.

0

डोंबिवली, ता 16 जाने (संतोष पडवळ) : रोटरी क्लब डोंबिवली आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पावर पॉइंट, पाणवाटा चित्र व पर्यावरण गीत या स्पर्धेमध्ये डोंबिवली पश्चिम येथील गावदेवी विद्यामंदिर शाळेने प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले असून त्याबद्दल सर्व विद्यार्थी-विध्यार्थीनी व शिक्षकांचा रोटरी क्लब डोंबिवली आणि पर्यावरण दक्षता मंडळाकडून अभिनंदन व सन्मान करण्यात आला. प्रसंगी गावदेवी विद्यामंदिरचे मार्गदर्शक संस्था अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री केशवजी भोईर व तुषार भोईर तसेच मुख्याध्यापक बारकू घावट सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे. गावदेवी विद्यमंदिरचे शिक्षक किरण वसईकर, पांडुरंग होले, गणेश उघडे यांचं विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!