⭕️ब्रेकिंग, मुंबई-गोवा महामार्गांवर पहाटे कार-ट्रक भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
रायगड, ता 19 जाने (ब्युरो रिपोर्ट) आज पहाटे ०४.४५ वा गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT8673 यांच्यामध्ये अपघात झाला आहे. अपघातामध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एका लहान मुलगी असे ९ जण मयत झाले आहेत.
एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असुन ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते.हायवे वरची वाहतुक सुरळीत करण्यात आली असून पुढील तपास सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक
रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.