दिवा शहराजवळील ओम् म्हातर्डेश्वर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेत सोनारपाड्यातील आर एम 11 संघाने जिकंले ऐक लाखांचे बक्षीस व ट्रॉफी
ठाणे, दिवा, ता 19 जाने (संतोष पडवळ) : ओम् म्हातर्डेश्वर क्रिकेट क्लब, म्हातर्डी व शिवसेना उपशहर प्रमुख वैष्णव नवनीत पाटील आयोजित दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या प्रसंगी सदर स्पर्धेत १६ संघानीं भाग घेतला होता. प्रथम क्रमांक विजेत्या संघास रोख एक लाख रक्कम व भव्य असा चषक प्रथम सोनारपाड्यातील गावदेवी आर एम इलेव्हन यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांकाचे रोख ५१,००० रू. व चषक सोनू मोनु जी जी स्पोर्ट्स (वाकलन) संघाला देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी सदर स्पर्धेस सुमित सुभाष भोईर, प्रवीण उतेकर, रमेश शिंदे, शंकर म्हात्रे,भगवान पाटील, विजय पाटील, महेश पाटील, हेमंत नाईक या मान्यवरांचा श्री.नवनीत पाटील यांनी स्वागत व सत्कार केला. https://youtu.be/3vO0ENOyiUw
बेस्ट फलंदाज दत्ता ठाकूर (५० धावा), उत्कृष्ट गोलंदाज उन्मेष भोईर (६ बाद), उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिकेत पाटील (सोनार पाडा), तीन दिवसीय क्रिकेट मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला जित भोईर (वाकलन) ७२ धावा व चार विकेट घेत क्रिकेटचा हिरो ठरला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय पाटील, मिथुन पाटील, आशिष पाटील, सिद्धांत पाटील, राज पाटील, राज शेलार, उमेश पाटील, बाबू शेलार, वैभव पाटील, गोवर्धन पाटील, शंकर म्हात्रे, गोपाळ जंगम व इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.