बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमीत्त दिव्यात शिवसेनाच्या शिंदे गटाच्या भव्य भजन स्पर्धा तर ठाकरे गटाचे बहुरंगी नमन.
ठाणे, दिवा (संतोष पडवळ) हिंदुह्रदयसम्राट ,शिवसेनाप्रमु ख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त ता 23 जानेवारी 2023 रोजी शिवसेनाच्या (शिंदे गट) वतीने भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत सदर स्पर्धेत एकूण 23 भजनी मंडळींनी सहभाग घेतला असून ही स्पर्धा दिव्यातील गणेश पाडा येथे पार पडणार आहे. मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे व विभाग प्रमुख श्री चरणदास म्हात्रे यांनी सदर स्पर्धेच आयोजन केले आहे तर शिवसेनाच्या (ठाकरे गट) यांनी रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील मामळे जाधववाडी येथील बहुरंगी नमनाचे आयोजन करण्यात केले आहे. दिव्यातील एस.एम.जी. शाळेचे मैदान येथे सादर होणार असून शिवसेना दिवा उपशहरप्रमुख सचिन राम पाटील, शिवसैनिक नवनीत पाटील, मा. नगरसेविका अंकिता पाटील, तसेच गुरुनाथ नाईक, अभिषेक ठाकूर, वैष्णव पाटील यांनी केले आहे. प्रसंगी सदर दोन्हीही शिवसेनेने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.