दिव्यात धर्मवीर आनंद दिघे जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर उत्सहात.
ठाणे, दिवा ता 27 जाने (संतोष पडवळ) : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त दिवा शहरात बाळासाहेबांची शिवसेना शाखा बेडेकर नगर, साई हॉस्पिटल व मानव कल्याण हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाने व मा. नगरसेवक दिपक जाधव यांच्या पुढाकाराने दिव्यातील बेडेकरनगर येथे सर्व नागरिकांसाठी मोफत हृदयरोग, मूत्रविकार तपासणी, मनक्यांचे आजार, रक्तदाब, नाक, घसा, डोळे तसेच दंत चिकिस्ता तपासणी करण्यात आले प्रसंगी आरोग्य शिबिरात बेडेकरनगर मधील रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला तर सदर शिबिरास अनेक मान्यवर व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.