दिव्यातील अँड.आदेश भगत यांची दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती
ठाणे, दिवा ता 27 जाने (संतोष पडवळ) : मुख्यमंत्री एकनाथज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या उपस्थितीत अँड.आदेश कमलाकर भगत यांची बाळासाहेबांची शिवसेना दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
दिवा शहरात भाजपचे प्रमुख पदाधिकारी, दिव्यातील लाखो रेल्वे प्रवाशांचे नेतृत्व करणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेलले अँड.आदेश भगत यांच्या शिवसेना प्रवेशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. रोखठोक आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणारे अँड.आदेश भगत यांनी केलेल्या अनेक उठाव व आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य दिवेकरांचा हक्काचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. भाजप पक्षांतर्गत कुरघोडीमुळे त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. येणाऱ्या पालिका निवडणूका लक्षात घेता अँड.आदेश भगत यांच्यावर पक्षाने मोठी जवाबदारी दिली असल्याचे कळत आहे.