भिवंडीत दोन मजली इमारत कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू.
ठाणे, ता 27 जाने ( संतोष पडवळ) : भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये एक जुनी दुमजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी होती. इमारत कोसळल्यानंतर इमारतीखालील ८ दुकाने होती. ही सर्व दुकाने ढिगाऱ्याखाली दाबली गेली. विशेष म्हणजे दबलेल्या एका दुकानात संबंधीत दुकानदार रात्री दुकानातच झोपले होते. हे कापड्याचे दुकान होते. इमारत कोसळल्यानंतर ते ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले पण त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असे मयताचे नाव आहे
दरम्यान, भिवंडीत अनेक धोकादायक इमारती असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. परंतु महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी वेळीच कारवाई होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. तसेच, या इमारतीला नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.