ठाणे,दिव्यासह आगासन रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या बाबत आमदार संजय केळकर मुंबई मंडल रेल प्रबंधकांच्या भेटीला.
ठाणे, दिवा : ठाणे स्टेशनवरील बूट पॉलिश करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांच्या विविध मागण्या, दिवा जंक्शन स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1,2,3 व 4 या स्टेशनची उंची तात्काळ वाढवण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना उतरण्यास त्रास होणार नाही व अपघाताचे प्रमाण कमी प्रमाणात होईल यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट घेतली.
दिवा स्टेशन वरील सर्व फलाट वर पाण्याची सुविधा तात्काळ करण्यात यावी जेणेकरून प्रवासाची गैरसोय होणार नाही. तसेच कोकण रेल्वे मार्गावर आगासन थांब्यावरती कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर गाडीचा थांबा लवकरात लवकर देण्यात यावा जेणेकरून कोकणात जाणाऱ्या लोकांचे हाल होणार नाहीत व नोकरदार वर्ग व शाळकरी मुलांना जाण्या येण्याची गैरसोय होणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिवा स्टेशनवरील आर ओ बी ब्रिज चे काम संथ गतीने चालू आहे, या संदर्भात तात्काळ ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून बाधितांना योग्य तो मोबदला देऊन लवकरात लवकर आर ओ बी ब्रिज पूर्णत्वास न्यावा यासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी मंडल रेल प्रबंधक रजनीश कुमार गोयल (DRM) यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याबरोबर साउथ सेल उपाध्यक्ष रविराज रेड्डी, दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.