दिवा रेल्वे स्थानकातील विविध कामांबद्दल तांत्रिक त्रुटी दूर करण्यास संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.
ठाणे, दिवा ता 27 जाने (संतोष पडवळ) : संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून दिवा रेल्वे स्थानकात ५/६ क्र फलाटावर शौचालयाचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले होते. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री विजय भोईर, श्री सचिन भोईर,रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी श्री पैठणकर साहेब व त्यांचे इतर सहकारी आज दिवा स्थानकात आले होते. तेव्हा श्री.विजय भोईर व सचिन भोईर यांनी त्यांना स्थानकात प्राधान्याने जी गरजेची कामे आहेत ती निदर्शनास आणून दिली ती पुढीलप्रमाणे:-
१) दिवा पूर्व व पश्चिमेला एक्सेलटर बसवण्यात काही तांत्रिक त्रुटी होत्या. म्हणून स्वतः श्री. पैठणकर साहेब , त्यांचे सहकारी व्ही.के.शर्मा, श्री.बळीराम सरोज व इतर अधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा निघावा म्हणून चर्चा केली तर पैठणकर साहेबांनी तातडीने त्या तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले.
२)लांब पल्ल्याच्या कोकणात व दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या फलाट क्र 7/8 च्या कमी लांबीमुळे दिव्यात थांबवता येत नाहीत त्यासाठी पैठणकर साहेबांना काहीतरी मार्ग काढण्यासाठी विनंती केली होती. या भेटीत त्यांच्याकडून असे समजले की हा प्रश्न थोडा जटिल आहे कारण कल्याण दिशेला फक्त 12 मीटर पर्यंतच रेल्वे लांबी वाढवू शकते. तरी देखील त्यांनी कल्याण दिशेकडे 12 मीटर व मुंबई दिशेकडील जागा वापरून ही लांबी कशी वाढवता येईल यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
३)त्याचबरोबरीने त्यांनी पाणपोई, शौचालयाच्या कामांना गती देण्याचे आदेश यावेळी दिले.
संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने इतरही रेल्वे स्थानकातील अडचणीविषयी पैठणकर साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांनी यावेळी खूपच सकारात्मक प्रतिसाद देऊन संघटनेच्या कार्यपद्धतीचेही यावेळी कौतुक केले.
या संपूर्ण वेळेत स्वतः विजय भोईर, सचिन भोईर, श्री पैठणकर साहेब व इतर अधिकारी जातीने उपस्थित होते.