जागतिक महिलादिनी ठाण्यात होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.
ठाणे, ता 1 फेब्रु ( संतोष पडवळ ) : मॅजिकल चार्मेंट आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिन विशेष आचल पुरस्कार सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. आयोजक समृध्दी पाटील व विजय पाटील यांच्या संकल्पनेतुन घेण्यात आली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट व कर्तृत्ववान महीलांचा आम्ही प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते “आचल पुरस्कार” देऊन आपला सन्मान करणार आहे. समाजातील अश्या अनेक स्तरावर महीला दिन विशेष पुरस्कार सन्मान सोहळे आयोजित केले जातात, मात्र राज्यातील व प्रत्येक जिल्ह्यातील कतृत्ववान महिला पुरस्कारापासुन वंचित आहेत अश्या कतृत्ववान महिला वर्गाला या माध्यमातुन आवाहन करण्यात येत आहे.
रविवार, दिनांक ५ मार्च २०२३ रोजी गडकरी कट्टा, गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळा होणार असून पुरस्कारासाठी राज्यभरातुन निवडप्रक्रिया सुरु असुन ही निवड प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मर्यादित आहे, तरी महिला दिन विशेष “आचल पुरस्कार” करिता आपला अर्ज पाठवण्या करीता त्वरित संपर्क करा, समृध्दी पाटील 74001 21417