भिवंडीत ऍसिड ड्रमचा स्फोट होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू.
ठाणे, भिवंडी, ता 1 फेब्रुवारी (संतोष पडवळ) : आज दिनांक ०१/०२/२०२३ रोजी सकाळी ०८:३५ वाजताच्या सुमारास सुमित हॉटेल जवळ, तळवली नाका, कांबे रोड, कांबे गाव, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) हे ऍसिड असलेला ड्रममधील ऍसिडच्या सॅम्पलची तपासणी करीत असताना जवळच असलेला एक कर्मचारी धुम्रपान करीत असल्यामुळे येथील ऍसिड ड्रमचा (प्रति ड्रम २३० लीटर ऍसिड याप्रमाणे एकूण ०४-ड्रमचा स्फोट) मोठा स्फोट झाला आहे. सदर घटनास्थळी निजामपूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व भिवंडी अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत. सदर घटनास्थळी Diethylene Glycol ऍसिड ड्रमचा स्फोट झाल्यामुळे दोन व्यक्तींच्या जागीच मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे:-
१) रमजान मोहम्मद जमील शेख (पु./ वय- ४५ वर्षे, भंगारचा व्यवसाय करणारी व्यक्ती)
२)मोहम्मद इस्माईल शेख (पु./ वय ३८ वर्षे, भंगारचा व्यवसाय करणारी व्यक्ती)