दिवेकरांसाठी क्लस्टर योजनेच्या सर्वेची पोचपावती मिळावी – अनिल शाळिग्राम.

0

ठाणे, दिवा, ता 6 फेब्रु (संतोष पडवळ) : दिवेकरांसाठी क्लस्टर योजना संजीवनी ठरेल का ? या विषयावर आता तरी जागा हो दिवेकर व दिवा भाजपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी श्री समर्थ मित्र मंडळ, सेव दिवा फौंडेशन, शिवशक्ती रिक्षा युनियन, आदर्श कोकण सहकारी संस्था, तन्वी फौंडेशन, नवरूप मित्र मंडळ, नागनाथ केबल नेटवर्क, आदर्श मित्र मंडळ, नरेश्मा फौंडेशन, अंकुश मित्र मंडळ इ.सामाजिक संस्थानीदेखील सहकार्य केले.तसेच सर्व भाजपचे पदाधिकारी सर्वश्री अशोक पाटील, रोहिदास मुंडे, सचिन भोईर,विनोद भगत, रोशन भगत, मधुकर भगत,नरेश पवार,समीर चव्हाण, युवराज यादव, दिलीप भोईर,मधुकर पाटील, प्रवीण पाटील तसेच ज्येष्ठ समाजसेवक गोवर्धन भगत,सपना भगत, ज्योती पाटील,संगिता भोईर, अंकुश मढवी,दिलीप भोईर, इ.उपस्थित होते.आता तरी जागा हो दिवेकरचे संस्थापक श्री विजय भोईर यांनी हे चर्चासत्र आयोजित करण्याचा उद्देश लोकांना समजावून सांगताना ही योजना कशी महत्वाची आहे व आपला या शिबिराचा नेमका उद्देश काय हे लोकांना पटवून दिले. सदर योजना समजावून सांगण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाचे क्लस्टरवर अगदी सखोल अभ्यास केलेले श्री अनिल शाळिग्राम,डॉ.चेतना दीक्षित यांनी अत्यंत विस्तृतपणे माहिती दिली.तसेच नागरिकांना सूचित केले की या योजनेबद्दल सर्वे करायला आलेल्या मंडळींना सहकार्य करा परंतु त्याचबरोबर सर्वे केल्याची पोचपावती मागण्याचा आग्रह धरा.तद्नंतर नागरिकांकडून विविध प्रश्न जाहीरपणे विचारण्यात आले व त्यांना डॉ.चेतना दीक्षित यांनी उत्तरे देऊन लोकांच्या शंका कुशंकाचे निरसन केले.या

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!