पुण्यातील मातोश्री रेवम्मा मुलिंचे खुले निवारा गृह संस्थेस बाल कल्याण समितीची भेट
पुणे ता 12 फेब्रुवारी (स्नेहा उत्तम मडावी) : दरवर्षी प्रमाणे ही संस्था कार्यक्रम करतात गोदावरी ताई ध्याडे यांचं काम प्रमाणिकपणाने करणे संपूर्ण वेळ संस्थाकडे देतात सगळे कर्मचारी या संस्थेमध्ये प्रमाणिकपणाने काम करतात संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेच नाव आहे सगळीकडे कौतुकाचे वर्षाव होत आहे हरवलेले मुला मुलींना आपल्या इथे संगोपोन करतात आणि आई वडील या नातेवाईक यांच्या ताब्यात देतात व पोलिसांना मदत करतात शोध घेण्यासाठी लहान मुलांनाचा आणि वयस्कर लोकांना कपडे फुथ पाटवर राहणाऱ्या गरीब कुटूंबाना थंडीपासून बचाव होण्यासाठी चादर रग स्वेटर वाटप करतात लोकडाऊनमध्ये अनेक गरीब कुटूंबाना मदत केली खाण्या पिण्याची सोय करत असतात आज रोजी गंगानगर फुरसुंगी पुणे- येथे कार्यरत असलेल्या निती निकेतन बाल संस्था संचलित मातोश्री रेवम्मा मुलिंचे खुले निवारा गॄह फुरसुंगी गंगानगर पुणे या संस्थेत मा. बाल कल्याण समिती पुणे भाग 02 च्या सर्व सदस्य व मा. अध्यक्षा यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेच्या प्रोजेक्ट काॅ जयश्री भारती मॅडम यांनी सर्वाचे स्वागत केले. त्या नंतर संस्थेमध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व म. बा. क. स अध्यक्षा नंदिता अंबिका मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आली. या वेळी सर्व सदस्य एड. परेश खाडिलकर.संध्या गायकवाड.सारीका अगज्ञान व कर्मचारी उपस्थित होते.
समितीने संस्थेचे सर्व कामकाज. कागदपत्रे. स्वच्छता पाहुन समाधान व्यक्त केले.
शेवटी संस्थेच्या सचिव मा. गोदावरी ध्याडे मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या वेळी संस्थेचे सोशल वर्कर अमित देशमुख. आउट रिच वर्कर स्नेहा उत्तम मडावी मॅडम. उजवला मॅडम. वनिता ताई. दिपाली ताई. रुपाली ताई. प्राजक्ता ताई ईत्यादी कर्मचारी हजर होते.