राज्यपाल राजीनामा ; दिव्यात भारतीय मराठा संघाच्या वतीने पेढे वाटप.
ठाणे, दिवा ता 12 फेब्रुवारी (संतोष पडवळ) वादग्रस्त वक्त्यावाबद्दल राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांचा अनेक राजकीय पक्ष्यांनी, सामाजिक संघटणांनी निषेध व्यक्त केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक वक्त्यव केल्यामुळे संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला होता. भारतीय मराठा संघाच्या वतीने भगतसिहं कोश्यारी यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी भगतसिग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्याने राज्यातील सर्व मराठा संघटना आनंदी झाल्या असून त्या आनंदात सकल मराठा फाउंडेशन प्रणित भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष श्री अविनाश पवार, उपाध्यक्ष, दीपक पालांडे, प्रदेश सचिव एस डी पाटील, ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरुण फणसे, दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर, सचिव रामकृष्ण सावंत, उपसचिव गणेश जाधव, सोशल मीडिया प्रमुख संतोष पडवळ, संघटक संदीप पाटील, अनिकेत शिंदे,कृष्णा पाटील, रंगराव पाटील, गौरी बेर्डे, मनोज हरुगडे ,समीर तेलंगे, अमित जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिवा शहरात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. https://youtu.be/Jxb2WlEi6ag