पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी दिव्यातील दैनिक पत्रकार संस्थेचे मुंब्रा पोलिसांना निवेदन ; आरोपीला कडक शिक्षेची संस्थेने केली मागणी.
ठाणे, दिवा ता 13 ( संतोष पडवळ ) मंगळवार दि.7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर-कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव येणाऱ्या पंढरीनाथ आंबेरकर (जमीन दलाल) यांच्या महेंद्र थार या गाडीने दै.महानगरी टाइम्सचे पत्रकार कै.शशिकांत वारिसे यांच्या यांना जोरदार ठोकर दिली.आणि यात पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यु झाला आहे.याप्रकरणी अपघाताची सखोल चौकशी करुन सबंधितांवर कडक कारवाई करावी यासाठी दैनिक पत्रकार संस्था दिवा,ठाणे यांनी मुंब्रा पोलिस ठाणे येथे वरिष्ठ पोलिस निरिक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी दैनिक पत्रकार संस्था दिव्याचे अध्यक्ष श्री संतोष पडवळ ,सचिव अमित जाधव,खजिनदार श्री सचिन ठिक,सदस्य आरती मुळीक आणि किरण किरतकुडवे हे उपस्थित होते.यावेळी आरोपी आंबेरकर याच्यावर पोलीसांमार्फक कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, मुळात या अपघाताचे दृश्य पाहता एका मोकळ्या जागी जेथे गाडी पासिंग होण्यास जागा आहे.असे असतानाही समोरा समोर येवून पंढरीनाथ आंबेरकर या इसमाने भरधाव येत ठोकर दिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे हा अपघात संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
राजापुर तालुक्यात नाणार येथे रिफायनरी प्रकल्प येवू घातलेला आहे.हा प्रकल्प विनाशकारी असल्याने येथील पत्रकार शशिकांत वारिसे हे नियमित आपल्या वर्तमान पत्रातून लोकांचा आवाज उठवत होते.त्यामुळे त्यांनी केलेल्या बातम्यांचा राग मनात ठेवून हा जाणूनबूजुन अपघात केलेला असावा असा संशय त्यांच्या कुटूंबियांसह आता नागरिक करीत आहे.