दिव्यातील विद्युत वायर भूमिगत करण्यास अखेर टोरंट कंपनीकडून सुरवात ; भाजपचे रोशन भगत यांच्या मागणीला यश

0

ठाणे, दिवा ता 13 (संतोष पडवळ ) दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी रोडसह दातिवली चौक ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्तावर इतरत्र पडलेल्या विद्युत भारित वायर अखेर टोरंट कंपनीकडून अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरु केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या वायर धोकादायक बनल्या असल्याचे निवेदन भाजपा ओबीसी मोर्चाचे दिवा अध्यक्ष श्री रोशन भगत यांनी टोरंट कंपनीकडे निवेदन देत कळविले होते.अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.

गेली कित्येक दिवस मुंब्रादेवी कॉलिनी रोड  ( दातिवली चौक ते सेंड मेरे शाळा पर्यंत)  रस्त्यावरती असलेल्या एस टी व एल टी लाईन्स चा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत होता. विद्युत लाईन वरती लोड आल्याकारणाने लाईन्स वारंवार तुटत होत्या. पावसाळ्यामध्ये ही वायर तुटून  दुर्घटना होत होत्या. सदर दुर्घटनेत जीवितहानी होण्याची ही शक्यता होती. रोशन भगत यांनी तत्काल टोरंट  अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या समसस्या निवरान करण्याची  विनंती केली.  सततच्या  पाठपुराव्यानंतर टोरंट  अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून या समस्येवरती उपाय म्हणून सदर रस्त्यावरील एसटी व एलटी विद्युत लाईन अंडरग्राउंड करण्याचे कामास सुरुवात केली आहे.

प्रसंगी स्थानिक रहिवाशांनी रोशन भगत यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर कर्तव्यदक्ष टोरंटच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.हे निवदेन सादर करण्यासाठी भाजपा अध्यक्ष दीवा मंडळ रोहिदास मुंडे, सरचिटणीस श्री समिर  चव्हाण, युवा मोर्चा सचिन भोईर,व्यापारी अध्यक्ष श्री जयदीप भोईर, सौ सपना भगत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!