दिव्यातील डॉ.सतीश केळशीकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश.
ठाणे ता 15 फेब्रु (संतोष पडवळ) : आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाणे शहरात सुरू असलेल्या यशस्वी वाटचालीस प्रेरित होऊन दिवा शहरातील डॉ सतीश केळशीकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपात जाहीर प्रवेश केला. प्रसंगी डॉ. सतीश केळशीकर यांची ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत तरुण मिश्रा, संजय सिंग , रविराज बोटले, दत्तात्रय कोलते, नवनाथ देशमुख, तेजस पास्ते , मयूर जाधव , कमलेश पाटील , प्रशांत गायकवाड , सत्यप्रकाश मिश्रा प्रशांत डावरुग , संगीता माळी, सुषमा देवरुखकर ,अनिता नांदगावकर साक्षी नांदगावकर , समिती घाग सुषमा कोलते , पूनम कोलते ,प्रज्ञा घात , नीलू मिश्रा, माधुरी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.
सदर पक्ष प्रवेशासाठी ठाणे शहर संघटक सरचिटणीस विलास साठे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर , दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण , ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत यांनी मोलाची भूमिका बजावली असून ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, ठाणे जिल्हा कार्यकारी सदस्य गणेश भगत , विजय भोईर , ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर , मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील , सपना भगत , व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर , डॉक्टर सेल अध्यक्ष विद्यासागर दुबे ,मंडळ उपाध्यक्ष निलेश भोईर , उ. भा. मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर आशिष पाटील , सुमित मढवी, विपीन भोईर ,प्रतिष साळुंके , आदी मान्यवर उपस्थित होते.