दिव्यात संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी.
ठाणे, दिवा ता 17 फेब्रु (संतोष पडवळ) : दिव्यात श्री संत सेवालाल गोर बंजारा समिती आयोजित श्री संत सेवालाल 284 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी आज दिव्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली.संध्याकाळी भोगवीधी कार्यक्रम पार पडला तर रात्री भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी अनेक मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. श्री संत सेवालाल गोर बंजारा समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार,खजिनदार श्यामसुंदर राठोड,कार्याध्यक्ष उमेश राठोड आणी कार्यकर्त्यांनी श्री संत सेवालाल 284 वी जयंती साजरी करण्यास अपार मेहनत घेतली.
प्रसंगी शंकर पवार, तारासिंग पवार, श्याम राठोड, उमेश राठोड,लक्ष्मण राठोड,मिथुन आडे,चंदू चव्हाण, विजय पवार,सुनील पवार, प्रवीण राठोड,रामेश्वर पवार, वसिया राठोड,यनवर राठोड,गंगाराम राठोड,रमेश राठोड,गोलू राठोड , राज राठोड , दिनेश राठोड,सुनील राठोड, राजू राठोड, मुरली राठोड, रामदास चव्हाण, प्रमोद राठोड, सुधीर राठोड,गोपाल राठोड, नशीब राठोड इत्यादी मान्यवर उवस्थित होते.