दिव्यात ठाकरे गटाचे गुरुनाथ नाईक व योगिता हेमंत नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
ठाणे, दिवा ता 18 फेब्रुवारी (संतोष पडवळ) : दिवा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दातीवली गाव येथे गुरुनाथ नाईक (विभाग प्रमुख) व सौ योगिता हेमंत नाईक (महिला उप शहर सघटक) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा. आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मा आमदार सुभाष भोईर यांनी त्यावेळी बोलताना सांगितलं की शिवसेनेची शाखा हीच शिवसेनेची ओळख आहे त्यामुळे शिवसेनेचा विस्तार हा शाखे पासूनच झाला आहे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्येचं निराकरण झालच पाहिजे असे काम करा व शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्या देऊन सौ.योगिता हेमंत नाईक व गुरुनाथ नाईक यांना आशीर्वाद दिले.
कार्यकर्माचे सूत्र संचालन श्री.गुरुनाथ नाईक (विभाग प्रमुख ) यांनी केले. अनेक महिलानीं व मान्यवरांनी अभिनंदन करत कार्यालयासाठी भेट वस्तू दिल्या. सदर या उदघाटनाला जिल्हा परिषद मा.सदस्य रमेश पाटील, दिवा उपशहर प्रमुख सचिन पाटील, अभिषेक ठाकूर, चेतन पाटील, नवनीत पाटील, हेमंत प्रल्हाद नाईक, अक्षय म्हात्रे, शशिकांत कदम, अजित माने, संजय निकम, विलास इंगळे, संजय जाधव व महिला आघाडी च्या विनया कदम, माधुरी नाईक, सुशीला रसाळ, सुनीता अहिरे, कविता उतेकर व ठाकरे गटाचे शेकडो पुरूष-महिला पदाधिकारी व युवा-युवती शिवसैनिक-युवासैनिक, महिला आघाडी मोठया संख्येने उपस्थित होते.