दिव्यातील आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
ठाणे ता 19 (संतोष पडवळ) : दिवा स्थित दातीवली मधील नामांकित आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक 17/02/2023 रोजी मोठ्या उत्साहात मान्यवर, पालक, शिक्षक व विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा झाला. अस शाळेचे संस्थापक ऍडवोकेट तुषार म्हात्रे सरांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितलं.
शिक्षणाबरोबर विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिव्यातील आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूल च्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात.आणि अशा कार्यक्रमांना विध्यार्थ्याबरोबर पालकांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . या ही वर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व वर्षाभरात निरनिराळ्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने आर्योत्सव 2023 च आयोजन केल गेलं होत. सदर कार्यक्रमास आज प्रमुख पाहुणे म्हणून ठाने महानगरपालिकेचे माजी उप महापौर रमाकांतजी मढवी साहेब, माजी प्रभागसमिती अध्यक्ष शैलेशजी पाटील साहेब, मा. श्री सोपान म्हात्रे साहेब, मा.श्री गोवर्धन भगत, मा.श्री चंदर नारायण म्हात्रे साहेब, मा. श्री पंडित चंदर म्हात्रे साहेब, तसेच मा.श्री.चेतन पाटील, मा. श्री तुषार पाटील, मा. श्री. नरेश पवार, मा.श्री.जयराम शेठ गायकवाड, मा.श्री.प्रकाश पाटील, मा.श्री. भानुदास पाटील, मा.श्री.संदीप येडेकर, मा.श्री. विजय भोईर, श्री विकास इंगळे, मा.श्री.गजानन म्हात्रे, मा.श्री. विष्णू म्हात्रे, मा.श्री. दत्तात्रेय म्हात्रे, मा.श्री संतोष पडवळ,मा.श्री.विष्णू पाटील, गुरुनाथ दळवी, पत्रकार अमित जाधव अशा पंचकृषितील मान्यवरांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दाखवली.सदर कार्यक्रमास विध्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर सादरीकरण करत उपस्थितांची मन जिंकली. विध्यार्थ्यांनी मनावर कोणतेही दडपन न ठेवता आपल्यातील कलेचा अविष्कार सादर केला.सदर कार्यक्रमाची संकल्पना ही वेगवेगळ्या सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, व मार्गदर्शक तत्वाचां आधार घेऊन सादर केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट तुषार म्हात्रे यांनी दिली.सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विध्यार्थी, पालक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महत्वाचे योगदान दिले. सदर कार्यक्रमाचे शाळेतील सहशीक्षका प्रज्ञा दांडगे व विष्णू पाटील यांनी सूत्रसंचालन यशस्वीरित्या पार पाडले.सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील सांस्कृतिक विभागाचे सहशीक्षका वृषाली फाफाळे यांनी केले अशा प्रकारचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रकारचे कार्यक्रम वर्षभर होत राहतात आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना नेहमीच वाव मिळत असतो आणि वर्षभर आम्ही असे कार्यक्रम शाळेचे सहशिक्षक साईनाथ सर आणि स्वप्नील सर यांच्या मदतीने करत असतो अशी माहिती शाळेच्या उप मुख्याध्यापिका प्रियांका फाफाळे यांनी दिली.