प्रियकरासोबत महिलेने दागिने व पैसा घेऊन पोबारा केलेल्या आरोपीस ठाणे पोलिसाकडून अटक.
ठाणे, ता 25 (संतोष पडवळ) : ठाणे पोलीस आयुक्तालयातील कापुरबावडी पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक २५ / १२ /२०१७ रोजी फिर्यादी यांच्या पत्नीचे, घरासमोर राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध जडल्याने सासरकडील वडीलोपार्जित सोन्यांच्या दागिण्यांची व रोख रक्कमेची चोरी केलेबाबत कापुरबावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं २६५ / २०१७ भादवि कलम ३८०, ३४ प्रमाणे दाखल आहे.
सदर गुन्हा घडलेपासुन यातील आरोपीतांचा मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा ठाणे येथुन कसोशिने तपास होत होता. सदर गुन्हयात कोणताही धागादोरा नसताना सततच्या चिकाटिने, व बारकाईने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीतांचे ठावठिकाणाची माहिती प्राप्त करून त्यांचा शोध घेवुन सदर गुन्हयात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पोलीसांनी आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयासंबंधाने सखोल विचारपुस करता, आरोपीतांनी फिर्यादी यांचे घरातील वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी केली व चोरीचे सोन्याचे दागिण्यांची विक्री करून, स्वतःचा कोणास संशय येवु नये याकरीता गोकर्ण (कनार्टक), गोवा, चिपळुन, रत्नागिरी, तळोजा या भागात अस्तित्व बदलुन राहत असताना, आरोपी नामे मंगेश संतोष मंगरशी याने स्वतःचे नांव मयांक केशव लांजेकर व महिला आरोपी ज्योती मंगेश पाटील हिने तिचे नांव उन्नती मयंक लांजेकर असे बदलुन सदर नावाचे गॅझेट प्रसिध्द करून त्याद्वारे पॅनकार्ड, आधारकार्ड बनवुन वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई ही ठाणे पोलीस आयुक्त, श्री. जय जीत सिंह, मा. सह पोलीस आयुक्त श्री. दत्ता कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त श्री. शिवराज पाटील (गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक राजपुत (गुन्हे शोध २) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी / आनंद रावराणे, सपोनिरी/ महेश जाधव, सपोनिरी/ जगदीश मुलगीर, सपोउपनिरी / स्वप्नील प्रधान, पोहवा / ६५६७ प्रशांत भुर्के, पोहवा / ३३७४ किशोर भामरे, पो. हवा / ५७७२ रूपवंत शिंदे, पोहवा / २०३० नागराज रोकडे, पोहवा / ३७३५ राजाराम शेगर, पोहवा / ३२७७ संदीप भालेराव, पोहवा / ११९७ अजित शिंदे, मपोहवा / ३१९२ आशा गोळे व चालक पोअं. / ५४८३ अजय मोरे यांनी केलेली आहे.