डॉ. प्रिती धारावत यांस दिव्यातील संत सेवालाल गोर बंजारा समितीकडून श्रध्दांजली.
ठाणे, दिवा ता. 27 (संतोष पडवळ)
डॉ. प्रिती धारावत (MBBS ) मुळगाव वरंगळ (तेलंगणा राज्य) एम जी एम मेडीकल कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजमधील रयागिंग प्रकरणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून प्रकरणी सदर मृत्यूची सखोल चौकशी करून दिवंगत डॉ. प्रिती धारावत यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आज दिवा (ठाणे) शहरात संत सेवालाल गोर बंजारा समितीच्या वतीने शोकसभा आयोजीत करण्यात आली होती. डॉ प्रिती या शिकत असलेल्या कॉलेजमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला असल्यामुळे सदर घटनेचा निषेध . व्यक्त करण्यात आला असून प्रकरणी संत सेवालाल गोर बंजारा समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यासाठी समाज आक्रमक झाल असून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेद्र फडणविस यांना निवेदन देण्यात येणार आहे असे समितीचे अध्यक्ष-शंकर पवार यांनी सांगीतले असून प्रसंगी तारासिंग पवार, विजय पवार, सीताराम सेठ, चंदू चव्हाण, गंगाराम राठोड, प्रमोद राठोड, मिथुन आडे, प्रविण राठोड, रवी राठोड, मुरली राठोड, सुनिल पवार, पांडु राठोड, लक्ष्मण राठोड. रघु पवार, धनराज राठोड, अश्विन पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.