दिवा पाश्चिमेकडील पाणी प्रश्न गंभीर भाजपचे डॉ.सतीश केळशिकर आक्रमक
ठाणे, दिवा ता 28 (संतोष पडवळ) : दिवा पश्चिम येथील एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी इ. भागात गेली अनेक वर्षे शेकडो वस्तीची लोकसंख्या आहे. अनेक इमारती तिथे उभ्या आहेत. ठाणे महानगरपालिका रहिवास्याकडून लाखोंची पाणी बिले वसुल करते परंतू तेथील लोकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अपुऱ्या पाणी पुरवठामुळे तासंनतास बिल्डिंगच्या खाली लाईन मध्ये उभे रहावे लागत आहे. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी रहिवासी यांना पाण्यासाठी रेल्वे लाईन (फाटक) क्रॉस करून आपला जीव धोक्यात घालून दिवा पूर्वेला यावे लागत आहे. यामध्ये बऱ्याच लोकांनी आपला जीवही गमावला आहे. तात्काळ या गंभीर अश्या पाणी समश्यासाठी लक्ष घालून ठोस उपाययोजना करून लोकांना पुरेश्या पाण्याची व्यवस्था द्यावी अन्यथा आम्हाला येत्या दिवसांत रहिवाश्यांना सोबत घेऊन ठोस भूमिका घ्यावी लागेल,असा स्पष्ट इशारा भाजपचे युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सतीश केलशिकर यांनी दिवा प्रभाग समितीचे नवनिर्वाचित सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांना निवेदन दिले आहे.प्रसंगी दिवा पश्चिम येथील अनेक रहिवासी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.