ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना समाजसेवक अमोल केंद्रे यांचं दिवा शहर पाहणी दौऱ्याचे आमंत्रण
ठाणे, दिवा ता 28 (संतोष पडवळ) : ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिवा शहरातील जनतेचे प्रश्न समस्या सोडून आपण न्याय द्यावा.दिवा शहरातील नागरिकांना सार्वजनिक शौचालय, पोलीस स्टेशन साठी जागा, ग्रंथालय, वाचनालय, सहकारी हॉस्पिटल, सांस्कृतिक भवन, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, खेळाचे मैदान,गार्डन, चांगले रस्ते फेरीवाल्या बांधवांच्यासाठी फेरीवाला झोन,मार्केट या सर्व सुविधा देवून.अनधिकृत बांधकामांचे शहर,पाणी नसलेले शहर, दिव्या खाली अंधार असलेले शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या शहरात आपण विकासाची ज्योत पेटून अंधार मय असलेल्या दिवा शहरात विकासाचा प्रकाश पाडून दिवा शहरातील नागरिकांना न्याय द्यावा.दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनी दिवा स्टेशन रस्ता, मुंब्रा देवी कॉलनी ट्रान्सफॉर्मर रस्ता,ओमकार नगर,वक्रतुंड नगर रस्ता,सावरिया डेअरी बेडेकर नगर, रविना अपार्टमेंट बेडेकर नगर रस्ता, दिवा स्टेशन गावदेवी मंदिर एन आर नगर रस्ता, एंजल पॅराडाईज शाळा नारायण भगत नगर रस्ता,दत्त मंदिर मागील मुंब्रा देवी कॉलनी रस्ता, वारेकर शाळा दत्त मंदिर रस्ता,जीवदानी नगर साबे गाव रस्ता तात्काळ बनवण्यासाठी,पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व इतर सुविधा देवून सहकार्य करण्यासाठी आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी दौरा करून दिवा शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडवण्यात याव्यात. असे दिवा शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी निवेदन देवून पाहणी दौरा करण्याचे समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी जाहीर निमंत्रण दिले आहे.