जागतिक महिलादिनी दिवा शहरात अवतरली महिलांची भगवी लाट
, दिवा ता 9 मार्च (संतोष पडवळ) जागतिक महिला दिना निमित्त दिवा शहरात शिवसेनेच्या शेकडो महिलांनी एकत्र येऊन भव्य दिव्य अश्या स्वरूपात भगवे फेटे घालून भगवे झेंडे हाती घेऊन वाजतगाजत रॅली काढण्यात आली. प्रसंगी अनेक महीलांचा गौरव करण्यात आला. महीला दिन रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगनी यांचे,
शिवसेना दिवा शहर यांच्यावतीने मनःपुर्वक आभार मानण्यात आले. सदर रॅलीमध्ये साक्षी रमाकांत मढवी, दीपाली उमेश भगत,सरिता रमाकांत मढवी, अर्चना निलेश पाटील, भाग्यश्री गुरुनाथ पाटील, ज्योती दीपक जाधव, दर्शना चरणदास म्हात्रे, मेघा शशिकांत पाटील
, सुविता विनोद मढवी यांची विशेष उपस्थिती लाभली.