दिव्यात जागतिक महिलादिनी भाजपकडून खेळ पैठणीचा उपक्रम उत्साहात.
ठाणे, दिवा ता 9 मार्च (संतोष पडवळ) : जागतिक महिला दिना निमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष डॉ सतीश केळशीकर यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा चे आयोजन करण्यात आले , सदर कार्यक्रमात समाजातील वेगवेगळ्या घटकातील महिलांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या माई सावर्डेकर , मीनाक्षी केळशिकर , यशस्वी उद्योजिका धनश्री मुकुंदे, आरपीएफ अधिकारी पूजा नवले , सरिता आरगडे, ठाणे महापौर चषक 2019 गोल्ड मेडल विजेते कमल बुट्टे , पत्रकार आरती मुळीक, त्याचबरोबर दिवा शहरातील अंगणवाडी कर्मचारीका , रिक्षा महिला चालक , घरकाम करणाऱ्या महिला , ज्येष्ठ महिला यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, तसेच दिवा शहरातील वेगवेगळ्या विभागातील महिलांना महिला दिनानिमित्त साडी वाटप करण्यात आले , सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री सारंग मेढेकर , सरचिटणीस अक्षय तिवरामकर , ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत , ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर , दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे , दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण , युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर , ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील , रेश्मा पवार , माजी महिला मोर्चा अध्यक्ष सीमा भगत, संगीता भोईर , पोखरण मंडळ सरचिटणीस सपना देवरे , उ. भा मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर यांची उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे व्यवस्थापन तरुण मिश्रा , संजय सिंग , दत्ता कोलते , सनी चव्हाण नवनाथ देशमुख, तेजस पास्ते संगीता माळी, सुषमा देवरुखकर यांनी केले