दिव्यात शिवसेना शाखा (तिसाई नगर) आयोजित शिवजयंती उत्सव उत्साहात.
ठाणे, दिवा ता 10 मार्च (संतोष पडवळ) : फाल्गुन चैत्र शके १९४४/४५ शुक्रवार रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
सकाळी शिवगर्जना मित्र मंडळ, मराठा वॉरीयर्स गड किल्ले संवर्धक यांच्या सहभागाने (दुर्गाडी ते शिवसेना शाखा तिसाई नगर, दातिवली) शिवज्योत आगमन झाले. नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती प्रतिस्थापना तर दुपारी भव्य आरोग्य शिबीर पार पडले. संध्याकाळी जय हनुमान हरीपाठ मंडळ आयोजित हरिपाठ झाला तर संद्याकाळी डबलबारी भजनाचा महासंग्राम रायगड भुषण संतोष शितकर / सुशिल गजानन गोठनकर कार्यक्रम पार पडला.
प्रसंगी मा उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक शाखाप्रमुख निलेश रोहिदास म्हात्रे, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला शाखा संघटक, उपशाखा संघटक, गट संघटक व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.