डोंबिवलीत जागतिक महिला दिनी सावित्री व सौंदर्या पुरस्कार प्रदान.

0

डोंबिवली ता 10 मार्च (संतोष पडवळ): लेखक, दिग्दर्शक व संपादक साप्ताहिक शब्दखडग प्रा.दिपक जाधव व गायिका रेखा निकुंभ यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेच्या श्री गणेश मंदिर संस्थानच्या लंबोदर सभागृहात बुधवार ८ मार्च २०२३ रोजी धुमधडाक्यात महिला दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दुबईत मिसेस ब्युटी क्विन किताब पटकावलेल्या सौ. दिप्ती पालन सौंदर्य स्पर्धेच्या परिक्षक म्हणून तथा टिटवाळा न्यूजचे सर्वेसर्वा राजू टपाल. शिवनेरी न्यूजचे संतोष पडवळ, शब्द सुमने साहित्यिक ग्रुपच्या प्रमुख श्रीमती अनिता कळसकर. सौ. केतकी म्हात्रे, साई म्हात्रे, सुनिल बनसोडे, रणधीर कनोजिया, बाबुराव जाधव, शिवाजी जाधव, लता जाधव, अशोक म्हस्के, श्याम चौगले हे उपस्थित होते..
या प्रसंगी विविध क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या
श्रीमती आशा सतीश चौधरी ( उद्योजिका – मत्स्य शेती ) सौ. संगिता खैरनार ( आदर्श गृहिणी ) कुमारी श्रद्धा टपाल (पत्रकार – अँकरिंग ) सौ. चंदा कनोजिया ( लाँड्री व्यवसाय ) सौ.सविता बोरसे ( अभिनेत्री ) सौ. सविता खुसपे ( आदर्श शिक्षिका ) सौ. सुरेखा कांबळे ( गायिका ) सौ. फरीदा काजी ( समाजसेविका ).सौ. केतकी म्हात्रे ( आदर्श शिक्षिका ) सौ. रेखा निकुंभ ( सुप्रसिद्ध गायिका – समाजसेविका ) सौ. साईली बनसोडे ( आदर्श शिक्षिका – समाजसेविका ) श्रीमती ज्योती गोळे ( साहित्यिका ) श्रीमती अनिता कळसकर ( साहित्यिका /समाजसेविका ) सौ. दिप्ती पालन ( अभिनेत्री ) सौ. जया शार्दुल ( उद्योजिका ) यांना शब्द खड्गचे संस्थापक – संपादक प्रा. दिपक जाधव सांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वरूपातील सावित्री पुरस्कार देण्यात आला..
तर सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. जया शार्दुल यांचा आला त्यांचा सत्कार सौ. दिप्ती पालन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला तर द्वितीय क्रमांक सौ. संगिता खैरनार यांचा आला त्यांचा सत्कार सौ. रेखा निकुंभ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. सौंदर्य स्पर्धेत अर्चना शुक्ला, सुधा पाटील, तेजस्विनी पलंगे, आशा चौधरी. ज्योती गोळे, संगिता खैरनार, सविता बोरसे, सविता खुसपे, झरना घोष, उषा वाघुळदे यांनी सहभाग नोंदवला तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेखा निकुंभ, अनिता कळसकर, दिप्ती पालन यांनी चार पावले या महिलां बरोबर चालून रँम्पवाॕकचा आनंद लुटला..
महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सौ. साईली बनसोडे यांनी हळदीकुंकू आणि चमचा गोटी तथा डोक्यावर वही घेऊन चालण्याची स्पर्धा आयोजित केली. यात चमचा गोटी स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री लोखंडे तर द्वितीय क्रमांक जया शार्दुल यांचा आला. डोक्यावर वही घेऊन चालण्याच्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक झरना घोष यांचा तर द्वितीय क्रमांक उषा वाघुळदे यांचा आला.. यांना श्री राजू टपाल, सौ. रेखा निकुंभ, श्रीमती अनिता कळसकर यांच्या हस्ते बक्षिसं तथा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले..
अशा प्रकारचे कार्यक्रम आपण समाजाचे देणे लागतो म्हणून आम्ही सातत्याने करीत राहू.. आमच्या डोक्यातील वेगवेगळ्या संकल्पना आम्ही नेहमीच प्रत्यक्षात उतरवीत राहू अशी प्रतिक्रिया प्राध्यापक दिपक जाधव आणि सौ. रेखा निकुंभ यांनी नोंदवली तर अशा कार्यक्रमांतून महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळते असे प्रतिपादन दिप्ती पालन आणि अनिता कळसकर यांनी केले. राजू टपाल आणि संतोष पडवळ यांनी कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या तर साई म्हात्रे यांनी आणि सुनिल बनसोडे यांनी आयोजक प्राध्यापक दिपक जाधव आणि रेखा निकुंभ यांना शाबासकी दिली..
सावित्री पुरस्कार प्राप्त महिला मुलींनी तथा सौंदर्या पुरस्कार प्राप्त महिलांनी प्राध्यापक दिपक जाधव आणि रेखा निकुंभ यांचे विशेष आभार मानले.. या प्रसंगी पुरस्कार प्राप्त महिलांनी त्यांचे मनोगत मांडले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक जाधव यांनी केले.. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक फ्री प्रेस जर्नल इंग्रजी, दैनिक नवशक्ती, शिवनेरी न्यूज, टिटवाळा न्यूज चॕनल तथा साप्ताहिक शब्द खड्ग वृत्तपत्र होते.. तर विशेष सहाकार्य लिपिका इंटरटेन्मेंट, आॕर्केस्ट्रा आर्यन धून, मैत्रेय प्रोडक्शन आणि सर्वोदय प्रसाद सामाजिक संस्थेने केले..

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!