मुलुंडच्या संभाजी सांस्कृतिक भवनात जागतिक महिला दिन उत्सहात संपन्न

0

मुंबई ता 10 मार्च (संतोष पडवळ) : महिला दिनानिमित्त मुलुंड येथे प्रभा फाउंडेशन समाजसेवी संस्थेने आणि फ्रेड टूर्सच्यावतीने – सुप्रिया पळसुलेदेसाई आणि देवेंद्र सावंत यांनी संभाजी सांस्कृतिक भवन (मुलुंड पूर्व ) येथे सामाजिक क्षेत्रात व कलाक्षेत्रात शिक्षक क्षेत्रात व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान डॉ-उमा दीक्षित यांच्या हस्ते केला गेला.
अभिनेत्री-संजीवनी जाधव , संगीतकार – तृप्ती चव्हाण ,देवामृत फाउंडेशनच्या अध्यक्षा समाजसेविका -प्रिया जाधव, समाजसेविका – उर्मिला छाजेड , शात्रीय गायक -मृणाल नाटेकर – भिडे , समाजसेविका- श्रद्धा रोहोकले ,शालिनी गायकवाड या महिलांना सन्मानित केले गेले .यावेळी डॉ. उमा दीक्षित यांचा सन्मान प्रभा फाउंडेशन आणि फ्रेडस टूर्स चे सर्व्हेसेव्हा सुप्रिया सुरेश पळसुलेदेसाई आणि देवेंद्र सावंत यांनी केला
यावेळी जे.डी कराओके स्टुडिओ (भांडुप) गायक गायक – जालिंदर जगताप गायिका – प्रिया कर्ले गायिका – मानसी कदम , यांनी संगीतबद्ध केलेल्या कलेबाबत प्रशंसा केली तसेच प्रसिद्ध निवेदक गायक – विजय शिंदे यांनी होम मिनिस्टर महिलांसाठी करमणूकीचा कार्यक्रम करण्यात आला .यावेळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. सुप्रिया विलास माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि प्रसिद्ध नृत्यांगना मालवणची लाडूबाई,अभिनेत्री ऋतुजा प्रमोद राणे हिने गणेश वंदना नृत्याचे छान सादरीकरण करून , कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यावेळी प्रभा फाउंडेशनचे सदस्य सुजीत पलसुळेदेसाई ,हर्षल पाटील, अंशु परब , यांचे मोलाचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमात तीनशे हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला , संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अभिनेता व दिग्दर्शक विश्राम आप्पाजी चव्हाण यांनी अप्रतिमरित्या केले होते.,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!