दिव्यात कोकण प्रतिष्ठान कडून मुंबई-गोवा महामार्गासाठी सह्यांची मोहीम.
प्रतिनिधी : संतोष पडवळ, ठाणे
ठाणे, दिवा ता 18 : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेले १२ वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू २०११ साली सुरू झाले होते पण आज २०२३ साल उगवल्यानंतरही हा महामार्ग अजून पूर्ण झालेला नाही.
एका बाजूला १० जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्ग काम सुरू होऊन पूर्णही झाला, पण ३ जिल्ह्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग १२ वर्षानंतरही अजून पूर्ण होत नाही. या अर्धवट मार्गावरून प्रवास करताना कितीतरी लोकांनी आपले जीव गमावले आहेत. पण तरीही अजून सरकार कडून हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी म्हणावं तितक्या वेगाने प्रयत्न होताना दिसून येत नाही.
मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून यासाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू आहे. याच लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज कोकण प्रतिष्ठान -दिवा यांच्याकडून भव्य स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या स्वाक्षरी मोहिमेत दिव्यातील कोकणी बांधवांनी सही करून या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला तसेच महामार्ग लवकर पूर्ण व्हावा ही अपेक्षाही व्यक्त केली.