दिवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ; सहा चैन स्नॅचिंगचे गुन्हे केलेला आरोपी अडीच लाखांच्या मुद्देमालासह अटकेत.

0

ठाणे, दिवा ता 18 मार्च (संतोष पडवळ) : दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पळून जाणारा व अशाप्रकारचे १० ते १२ दिवसांमध्ये ०४ घटना घडल्याने सदर गुन्हेगारास अटक करून चैन स्नॅचिंग गुन्हयांना प्रतिबंध करणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.

श्री. एन बी कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे यांनी गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि शेळके, बोरसे व अमलदार यांची दोन पथके तयार करून गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पध्दत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच इतर तांत्रिक व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला.

प्रसंगी दिवा,खर्डीगाव, मुंब्रा व शिळफाटा परिसरातील सुमारे ११० खाजगी व महानगरपालिकेचे सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांचे फुटेज संकलन केले. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करता आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व त्याचा जाण्या-येण्याचा मार्ग निष्पन्न केला. सदरचा आरोपी हा गुन्हे करून खर्डी गाव परीसरात जात असल्याचे आढळून आल्याने नमुद पथकांनी दोन दिवस आहोरात्र सापळा लावून आरोपीस दिनांक ११/३/२०२३ रोजी रात्री ०९.१५ सुमारास निर्मलनगरी खर्डीगाव येथून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याचे नाव कमलेश रामानंद गुप्ता, वय ३३ वर्षे, व्यवसाय- ओला चालक, त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा मुंब्रा पोलीस ठाणे गुन्ह रजि. क्र. २४९ / २०२३ भा.दं.वि कलम ३९२ या गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याचे समजले. ऑनलाईन लॉटरीवर पैसे खर्च करत असल्याने तो असे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीकडून ऐका दूचाकीसह 2,51,148 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. गणेश गावडे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ शहर, मा. श्री. विलास शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग यांच्या मार्गदशनाखाली मुंब्रा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, बाबासाहेब निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके, कृपाली बोरसे, संतोष उगलमुगले, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र किंगरे, अमंलदार सुभाष मोरे, जयेश तामोरे, योगेश पाटील, किशोर वैरागकर, निलेश लोंढे, प्रमोद शिंदे, गायकवाड, प्रमोद जमदाडे व अजीत येळे यांनी केली आहे. पुढील तपास सपोनि शेळके करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!